लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम

माझी शाळा

सुंदर माझी शाळा



सुंदर माझी शाळा हो
सुंदर माझी शाळा ll धृ ll

शाळेभोवती सारी झाडं
रक्षण करण्या आम्ही पुढं
रोज आम्हाशी बोलतसे हा
भिंतीवरचा फळा ll १ ll

शिक्षण द्याया गुरुजन दक्ष
शाळेत असते आमुचे लक्ष
गावोगावच्या मुलांमुलींना
लावितसे ही लळा ll २ ll

स्वच्छ आमचा परिसर सारा
शुद्ध मोकळा इथला वारा 
खेळ खेळण्या मैदानावर
होतो आम्ही गोळा ll ३ ll

ज्ञानप्रकाशे आम्ही उजळतो
शिस्तीचेही धडे गिरवतो
शाळेमधल्या संस्कारांनी
फुलतो जीवनमळा
सुंदर माझी शाळा ll ४ ll

No comments:

Post a Comment